Door43-Catalog_mr_tn/MAT/09/01.md

2.2 KiB

येशूने पक्षघाती माणसाला बरे केले त्याच्या अहवालाची सुरुवात.

येशू तारवांत चढला

कदाचित शिष्य येशूच्या बरोबर गेले (पाहा यु डी बी ).

तारू

कदाचित ८:२२ मध्ये असेलेले तेच तारू असावे. केवळ गोंधळ टाळण्यासाठी स्पष्ट करा.

तो स्वत:च्या नगरांत आला

"जेथे तो राहात होता ते नगर"

पाहा

मोठ्या कथेमधील एका नवीन सुरुवातीला हे चिन्हांकित करते. गेल्या घटनेमध्ये असलेल्या लोकांपेक्षा ह्यांत दुसरे लोक समाविष्ट असू शकतात. तुमच्या भाषेमध्ये हे करण्याचा कांहीतरी मार्ग असावा.

ते....त्यांचे

ते ज्यांनी पक्षघाती माणसाला येशूकडे आणले. त्यामध्ये स्वत: पक्षघाती समावेश असू शकतो.

पुत्र

तो मनुष्य येशूचा खरा मुलगा नव्हता. येशू त्याच्याशी विनयशीलपणे बोलत होता. जर हे गोंधळात टाकीत असेल तर, त्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते, "माझ्या मित्रा" किंवा "हे तरुण माणसा" किंवा ते वगळू शकता.

तुझ्या पापांची क्षमा झाली आहे

"देवाने तुझ्या पापांची क्षमा केली आहे" किंवा "मी तुझ्या पापांची क्षमा केली आहे."