Door43-Catalog_mr_tn/MAT/06/22.md

4.3 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तुझा" आणि "तुझे" ची सारी उदाहरणे एकवचनी आहेत, परंतु तुम्हांला त्यांचे बहुवचनांत भाषांतर करावेसे वाटेल,

डोळा हा शरीराचा दिवा आहे

"एखाद्या दिव्यासारखा, डोळा तुम्हांला सर्व कांही स्पष्टपणे वस्तूंना दाखवितो" (पाहा: रूपक)

जर तुझे डोळे निर्दोष असले तर, तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल

जर तुझे डोळे निरोगी असतील, जर तू पाहू शकतोस, तर तुझे संपूर्ण शरीर योग्यरित्या कार्य करण्यासाठी सक्षम आहे. म्हणजे तुम्ही चालू आणि काम करू शकत वगैरे. जसे देव गोष्टींना पाहातो तसे पाहाणे ह्यासाठी हे रूपक आहे. विशेषेकरून औदार्य आणि लोभ ह्या क्षेत्रांमध्ये (पाहा: यु डी बी )

डोळा

कदाचित तुम्हांला ह्याचे बहुवचनामध्ये भाषांतर करावे लागेल.

प्रकाशमय होईल

समज असण्याचे हे रूपक आहे

जर तुझा डोळा सदोष असला

हे कांही जादूचा उल्लेख करीत नाही. पर्यायी भाषांतर: "जसे देव पाहातो त्या दृष्टीकोनातून तुम्ही पाहत नाही." लोभासाठी हे सुद्धा रूपक आहे (पाहा: यु डी बी "तुम्ही किती लोभी व्हाल" आणि २):१५).

तुझ्यातील प्रकाश खरे पाहिल्यास अंधारच आहे

"तुम्ही जो प्रकाश समजता खरे पाहिल्यास तो अंधारच आहे" एखादा व्यक्ती देवाच्या दृष्टीकोनातून बघतो असे वाटते पण तो बघत नाही ह्यासाठी हे रूपक आहे.

तो अंधार केवढा

अंधारांत असणे ही वाईट गोष्ट आहे. अंधारांत असतांना मी प्रकाशांत आहे असे समजणे ही अधिक वाईट गोष्ट आहे.

कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीति करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानील

हे दोन्ही वाक्यांश एकाच समस्येचा उल्लेख करतात

एकाच वेळेला देव आणि धन ह्या दोघांवर प्रीति करून निष्ठेने राहू शकत नाही (पाहा: समांतरवाद)

तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही

"एकाच वेळेला तुम्ही देवाची आणि धनाची उपासना करू शकत नाही"