Door43-Catalog_mr_tn/MAT/06/16.md

1.5 KiB

येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.

येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. १७ आणि १८ व्या वचनांत येणारे "तू" आणि "तुझ्या" हे सर्व शब्द एकवचनी आहेत, परंतु १६ वचनांत असलेल्या "तू" ह्या बहुवचनी शब्दाशी जुळण्यासाठी तुम्हांला त्या सर्व शब्दांचे बहुवचनात भाषांतर करावे लागेल.

शिवाय

"देखील"

आपल्या डोक्याला तेल लाव

"तू जसा सर्वसामान्यपणे राहतोस तसाच राहा." येथे डोक्याला तेल लावणे म्हणजे आपल्या केसाची सर्वसाधारपणे काळजी घेणे होय. "ख्रिस्त" म्हणजे "अभिषिक्त" ह्याच्याशी त्याचा कांहीच संबंध नाही.