Door43-Catalog_mr_tn/MAT/01/18.md

1.6 KiB

येशूच्या जन्माकडे घेऊन जाणाऱ्या घटनांच्या सुरूवातीचा हा वृत्तांत आहे. जर तुमच्या भाषेमध्ये विषय बदल व्यक्त करण्याचा कांही मार्ग असेल, तर तुम्ही त्याच्या येथे उपयोग करावा.

योसेफाशी लग्न करण्यासाठी मरीयाची मागणी झाली होती

"लग्न करण्याचे वचन दिले होते" किंवा "लग्न करण्यांस वचनबद्ध होती." साधारणपणे आई

बाप त्यांच्या मुलांच्या लग्नाची व्यवस्था करतात.

त्यांचा सहवास होण्यापूर्वी

ह्या शिष्टोक्तिचा अर्थ "त्यांचा लैगिक संबंध होण्याअगोदर." (पाहा:शिष्टोक्ति)

ती गर्भवती झालेलि दिसून आली

"तिला मूल होणार अशी त्यांना जाणीव झाली" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी).

पवित्र आत्म्या द्वारे

पवित्र आत्म्याने मरीयेला मूल देण्यासाठी सक्षम केले.