Door43-Catalog_mr_tn/LUK/24/30.md

3.3 KiB
Raw Permalink Blame History

असे झाले की

त्या कथेतील महत्वाची घटना दर्शवण्यासाठी ह्या वाक्यांशाचा वापर झाला आहे. जर तुमच्या भाषेत हे करण्याचा मार्ग असेल तर, येथे त्याचा वापर करण्यावर विचार करा.

मग त्यांचे डोळे उघडले गेले

‘’मग त्यांना कळले’’ किंवा ‘’मग त्यांना समजले’’

ती भाकर

ह्याचा संदर्भ खमिराच्या शिवाय तयार केलेल्या भाकरीशी आहे. सामान्य रीतीने त्याचा संदर्भ अन्नाशी येत नाही.

त्याला आशीर्वादित केले

ह्याचे भाषांतर ‘’त्यासाठी आभार मानून’’ किंवा ‘’त्यासाठी देवाचे आभार मानले.

तो त्यांच्या दृष्टीआड झाला

ह्याचा अर्थ म्हणजे तो अचानक तिथे नव्हता. तो अदृश्य झाला असा त्याचा अर्थ नाही.

आमच्या अंतःकरणात आतल्या आत उकळी येत नव्हती का....

‘’आमची अंतःकरणे आमच्या आतल्या आत जळत होती’’ (युडीबी). हा एक अभिप्रेत प्रश्न आहे. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

आमच्या तेवत असलेले अंतःकरण

हा एक रूपक अलंकार आहे ज्यात ते येशू बोलत असतानाच्या तीव्र भावनांचे वर्णन केले गेले आहे. त्या प्रश्नाचे भाषांतर ‘’तो आमच्याशी बोलत असताना आमच्यामध्ये खूप तीव्र भावना होत्या... (पहा: रूपक अलंकार)

आमच्यात

दोन पुरुष एकमेकांशी बोलत होते. म्हणून ‘’आमच्यात’’ हा दुहेरी रीतीने समाविष्ट करून घेणारा शब्द आहे जे हे फरक करतात. (पहा: इंग्रजी अनेकवचनी सर्वनाम आणि समाविष्टता)

त्याने शास्त्रवचने उघडली तेव्हा

‘’त्याने जेव्हा त्या शास्त्रवचनाचा उलगडा आपल्याला केला. येशूने एक पुस्तक किंवा ग्रंथपटाची गुंडाळी उघडली नाही.