Door43-Catalog_mr_tn/LUK/24/15.md

2.0 KiB
Raw Permalink Blame History

असे झाले की

ती कृती कुठे सुरु होते हे दर्शवण्यासाठी ह्या वाक्यांशाचा वापर केला आहे. येशू त्याच्याकडे येत आहे ह्याने त्याची सुरुवात होते. जर तुमच्या भाषेत असे करण्याचा मार्ग असेल, तर इकडे त्याचा वापर करण्याचा विचार करा.

येशू स्वतः

‘’स्वतः’’ येशू आणि तो त्यांना दर्शन देतो त्या आश्चर्यावर लक्ष केंद्रित करतो. आतापर्यंत स्त्रियांनी ते देवदूत पाहिले होते, पण येशूला कोणीच पाहिले नव्हते.

त्याला ओळखण्यापासून त्यांचे डोळे बंद करण्यात आले होते

‘’येशुला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे बंद करण्यात आले होते. येशूला ओळखण्याची पुरुषांची क्षमता म्हणजे त्यांच्या डोळ्यांची त्यांना ओळखण्याची क्षमता ह्याच्याशी तुलना केली आहे. ह्याचे भाषांतर ‘’त्याला ओळखण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात आले’’ किंवा ‘’काहीतरी त्यांना त्याला ओळखण्यापासून परावृत्त करत होते. (पहा: उपलक्षण अलंकार)