Door43-Catalog_mr_tn/LUK/24/04.md

1.7 KiB
Raw Permalink Blame History

असे झाले की

ह्या वाक्यांशाचा उपयोग गोष्टीतील नवीन घटनेला व्यक्त करण्यासाठी केला गेला आहे. जर तुमच्या भाषेत असे करण्याचा मार्ग असेल तर, इकडे तो वापरण्याचा विचार करा.

लखलखीत वस्त्रे

‘’चमकणारे, भडक कपडे घालून’’ (युडीबी)

भयभीत होऊन

‘’खूप घाबरले’’

मेलेल्यांमध्ये तुम्ही जीवनतांचा शोध का करता?

हा एक अभिप्रेत प्रश्न आहे. (पहा: अभिप्रेत प्रश्न) ह्याचे भाषांतर ‘’मेलेल्या लोकांमध्ये तुम्ही जिवंत माणसाला पाहता’’ किंवा ‘’ज्या ठिकाणी मेलेल्या लोकांना पुरतात त्या ठिकाणी तुम्ही जिवंत व्यक्तीचा शोध घेऊ नये! (युडीबी)

तुम्ही का शोधता

‘’तू’’ ह्या ठिकाणी ज्या स्त्रिया आल्या त्यांना संदर्भ देत अनेकवचनी स्वरुपात वापरण्यात आला आहे. (पहा: तू चे स्वरूप)