Door43-Catalog_mr_tn/LUK/22/66.md

2.9 KiB
Raw Permalink Blame History

त्याला न्यायसभेत नेले

शक्य अर्थ आहेत १)’’वडीलमंडळाने येशूला न्यायसभेत नेले’’ किंवा २)’’रक्षकांनी येशूला वडीलमंडळाच्या न्यायसभेत आणले. काही भाषांमध्ये ‘’त्यांनी’’ हे सर्वनाम वापरून कोणी येशूला आणले हे सांगण्याचे टाळतात (युएलबी) किंवा एक क्रियाहीन क्रियापद वापरून: ‘’येशूला त्या न्यायसभेत नेण्यात आले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

असे म्हणत

‘’वडील येशूला म्हणाले’’

आम्हाला सांग

‘’तू ख्रिस्त आहे हे आम्हाला सांग’’

मी जर तुम्हाला सांगितले, तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही

येशूने केलेल्या दोन काल्पनिक विधानांपैकी हे पहिले विधान आहे. त्या लोकांनी त्याच्यावर दुर्भाषणाचा आरोप करू नये म्हणून येशूने त्यांना प्रतिसाद देण्याचा मार्ग होता. ती कृती प्रत्यक्षात घडली नाही हे दर्शवण्यासाठी तुमच्या भाषेत काही मार्ग किंवा दर्शक असेल. (पहा: काल्पनिक परिस्थिती)

मी जर तुम्हाला विचारल, तुम्ही उत्तर देणार नाही

हे दुसरा काल्पनिक विधान आहे.

मी जर तुम्हाला सांगितले.....मी जर तुम्हाला विचारले

येशू म्हणत आहे की तो बोलला किंवा त्यांना बोलायला लावले ह्याच्याशी त्याला काही फरक पडत नाही, ते योग्य रीतीने प्रतिसाद देणार नाही. हे दोन्ही वाक्यांश एकत्रित येशूची प्रवृत्ती स्पष्ट करतात की न्यायसभा खरेतर सत्याकडे पाहत नव्हती.