Door43-Catalog_mr_tn/LUK/22/41.md

1.7 KiB
Raw Permalink Blame History

एक दगड फेकण्याच्या अंतरावर

हा एक शब्दप्रयोग आहे ज्याचा अर्थ ‘’त्या अंतरापर्यंत जिथे कोणीतरी दगड मारू शकेल. ह्याचे भाषांतर ‘’कमी अंतर’’ किंवा अंदाजाने केलेली मोजमापणी जसे ‘’किमान ३० मीटर’’ (युडीबी). (पहा: शब्दप्रयोग)

माझ्याकडून हा प्याला दूर कर

हा एक रूपक अलंकार आहे. येशू त्या दुखसह्नाविषयी बोलत होता जणू काही ते एका प्याल्यात होते आणि तो त्याचे प्राशन करणार होता. ह्याचे भाषांतर ‘’माझ्यापासून हा दुखसहनाचा प्याला दूर कर’’ किंवा माझ्यापासून हे दुखसहन दूर कर’’ किंवा ‘’अशा रीतीने सहन करण्यापासून मला सोडव. (पहा: रूपक अलंकार)

तरीही माझी इच्छा नाही, तर तुझी पूर्ण होवो

ह्याचे भाषांतर ‘’तरीही, माझ्या इच्छेपेक्षा तुझी इच्छा पूर्ण व्हावी असे मला वाटते.