Door43-Catalog_mr_tn/LUK/22/07.md

2.4 KiB
Raw Permalink Blame History

बेखामीर भाकरीचा दिवस

‘’खामिराच्या शिवाय असलेला दिवस’’ किंवा ‘’सखल भाकरीचा दिवस. ह्या दिवशी यहुदी लोक सर्व खमीर टाकलेली भाकर घरातून काढत असे. मग सात दिवस बेखामीर भाकरीचा सण साजरा करत असे.

त्या वलहांडणाच्या कोकर्याचे अर्पण झाले पाहिजे

‘’लोकांना शेवटल्या भोजनाच्या(वलहांडणाच्या) आधी त्या कोकर्याला मारायचे होते. प्रत्येक कुटुंब किंवा काही कुटुंब एकत्र येऊन कोकरा मारून एकत्र खात असे, म्हणून अनेक कोकर्यांचा वध होत असे.

जेणेकरून आपण एकत्र खावे

येशू ह्यावेळी पेत्र आणि योहान ह्यांचा समावेश करत होता जेव्हा त्याने ‘’आम्ही’’ असे म्हंटले. पेत्र आणि योहान त्या समूहातील लोक असतील जे ते भोजन खातील. (पहा: समाविष्ट)

तयारी

हा एक सामान्य शब्द आहे ज्याचा अर्थ म्हणजे ‘’तयार करणे. येशू पेत्र आणि योहान ह्यांना सर्व स्वयपाक करायला सांगत नाही.

आम्ही तयारी करावी असे तुम्हाला वाटते का

‘’आम्ही’’ ह्या शब्दात येशूचा समावेश नाही. भोजन तयार करणाऱ्या गटात येशू नसणार. (पहा: निवडक)

तयारी करणे

‘’भोजनाची तयारी करणे’’ किंवा ‘’भोजन तयार करणे’’