Door43-Catalog_mr_tn/LUK/21/25.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

(भविष्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.)

राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील

ह्याचे भाषांतर ‘’राष्ट्रातील लोक घाबरे होतील’’ किंवा ‘’राष्ट्रातील लोक खूप त्रस्त होतील.

समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने घाबरे होऊन

‘’कारण समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने ते गोंधळून जातील’’ किंवा ‘’समुद्राचा कल्लोळ आणि त्यातील कठोर हालचालीने ते घाबरतील. ह्याचा संदर्भ समुद्रात येणारे अनपेक्षित वादळ आणि नाश ह्यांच्याशी आहे.

ज्या गोष्टी पृथ्वीवर येत आहेत

‘’ज्या गोष्टी पृथ्वीत घडतील’’ किंवा ‘’ज्या गोष्टी जगाच्या पाठीवर घडतील’’

आकाशातील बळे डळमळतील

‘’आकाशातील बलवान गोष्टी डळमळतील. शक्य अर्थ १)सूर्य,चंद्र आणि तारे ह्यांच्यातील गोष्टी सामान्य रीतीने हालचाल करणार नाही किंवा २)आकाशातील बलवान आत्मे त्रस्त होतील. पहिला अर्थ सुचवला जाते.