Door43-Catalog_mr_tn/LUK/21/16.md

3.1 KiB
Raw Permalink Blame History

(भविष्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.)

तुम्हाला स्वाधीन करण्यात येईल

‘’तुम्हाला अधिकारांच्या स्वाधीन केले जाईल’’ किंवा ‘’तुम्हाला धरून देण्यात येईल’’

तुमच्यातील काही जणांना ते जिवे मारतील

‘’तुमच्यातील काही जणांना ते ठार मारतील. शक्य अर्थ म्हणजे १)’’अधिकारी तुमच्यातील काही लोकांना ठार मारतील’’ किंवा २)’’जे तुम्हाला स्वाधीन करतील ते तुम्हाला ठार मारतील. पहिला अर्थ अधिक स्वाभाविक आहे.

माझ्या नावामुळे

‘’माझ्यामुळे’’ किंवा ‘’तुम्ही माझे अनुसरण करता म्हणून’’

पण तुमच्या डोक्याच्या एका केसाचा देखील नाश होणार नाही

ह्याचे भाषांतर सकारात्मक रीतीने ‘’तुमच्या डोक्यावरील प्रत्येक केस सुरक्षित राहील. हा भाषेचा एक अलंकार आहे ज्याचा अर्थ ‘’तुम्हाला अजिबात इजा पोहोचणार नाही. संपूर्ण व्यक्तीचा नाश होणार नाही ह्यावर भर देण्यासाठी व्यक्तीच्या सर्वात छोट्या भागाचा संदर्भ येथे दिला गेला आहे. येशूने आधीच म्हंटले होते की त्यांच्यातील काही लोकांना ठार मारतील. म्हणून काही लोक म्हणतात की अध्यात्मिक रीतीने इजा पोहचू नये म्हणून ते म्हणण्यास ‘’पण ह्या गोष्टी खरे तर तुम्हाला खरेच इजा पोहोचू शकत नाही.

तुमच्या धीराने

‘’दृढ राहून. त्याचे भाषांतर ‘’जर तुम्ही मध्येच हार मानून सोडून दिले नाही तर.

तुम्ही आपले जीव मिळवाल

‘’तुम्हाला जीवन मिळेल’’ किंवा ‘’तुम्ही सदैव जगाल’’