Door43-Catalog_mr_tn/LUK/20/41.md

3.6 KiB
Raw Permalink Blame History

ते कसे हे म्हणतात

हा एक अभिप्रेत प्रश्न आहे. ह्याचे भाषांतर ‘’ते का असे म्हणतात’’ किंवा ‘’त्यांनी तसे म्हणण्याबाबत विचार करावा’’ किंवा ‘’मी त्यांच्या ह्या बोलण्याबाबत बोलेन. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

दाविदाचा पुत्र

‘’दावीद राजाचा वंशज. ‘पुत्र’’ हा शब्द येथे एक वंशजाला संदर्भ देण्यासाठी वापरला गेला आहे. (पहा: उपलक्षण अलंकार) ह्या बाबतीत ह्याचा संदर्भ जो देवाच्या राज्यावर अधिकार करेल त्याच्याशीआहे.

परमेश्वराने माझ्या प्रभूला म्हंटले

ह्याचे भाषांतर ‘’परमेश्वर देवाने माझ्या प्रभूला म्हंटले’’ किंवा ‘’देवाने माझ्या प्रभूला म्हंटले. स्तोत्र ११०:१ मधील हा एक उद्गार आहे जो म्हणतो ‘’याह्वेह माझ्या प्रभूला म्हणाला. पण यहुदी लोकांनी ‘याह्वेह’’ म्हणण्याचे थांबवले आणि त्या ऐवजी ‘’प्रभू’’ असे बरेचदा म्हंटले.

माझा प्रभू

दावीद ख्रिस्ताला ‘’माझा प्रभू असे संबोधत आहे.

माझ्या उजव्या हाताला

उजवी बाजू ही सन्मानाचे स्थान आहे. देव मसिहाचा सन्मान त्याला ‘’माझ्या उजवीकडे बस असे म्हणण्याने करत आहे.

जोपर्यंत मी तुझ्या शास्त्रुंचे तुझ्यासाठी पादासन करत नाही

हा एक रूपक अलंकार आहे. ह्याचे भाषांतर ‘’जोपर्यंत मी तुझ्या शत्रूंना एका पादासानाच्या सारखे करत नाही’’ किंवा ‘’तुझ्यासाठी जोवर मी तुझ्या शास्त्रूंना जिंकून घेत नाही. (पहा: रूपक अलंकार)

पादासन

एक स्थान जथे लोक आपले पाय त्यावर ठेवतात.

म्हणून दाविदाचा पुत्र कसा आहे?

म्हणून ख्रिस्त आता दाविदाचा पुत्र कसा बनू शकतो? हा एका अभिप्रेत प्रश्न आहे. ह्याचे भाषांतर ‘’हे दर्शवते की ख्रिस्त हा केवळ दाविदाचा वंशज नाही.