Door43-Catalog_mr_tn/LUK/20/21.md

2.3 KiB
Raw Permalink Blame History

पण तू देवाच्या मार्गांचे सत्य शिकवतो

येशुबद्द्ल त्यांना काय माहित होते हे ते हेर सांगत होते.

कोणाच्याने देखील ते प्रभावित होत नाही

शक्य अर्थ १) महत्वाच्या लोकांना जरी ते आवडत नसेल तरीही तुम्ही ते सत्य बोलून दाखवता’’ (युडीबी) किंवा २)’’तुम्ही जे एकापेक्षा दुसऱ्या व्यक्तीला अधिक कृपाप्रसाद दाखवत नाही.

कैसराला कर भरणे योग्य आहे का

येशूने ‘’हो’’ किंवा ‘’नाही’’ असे काहीतरी म्हणावे अशी त्यांची इच्छा होती. जर त्याने ‘’हो’’ म्हंटले तर यहुदी लोक त्याच्यावर चिडेल असते कारण तो त्यांना एका विदेशी शासनाला कर देण्यास सांगत होते. जर त्याने ‘’नाही’’ म्हंटले तर धार्मिक पुढारी रोमी लोकांना सांगू शकले असते की येशू लोकांना रोमी नियम तोडायला सांगत आहे.

ते योग्य आहे का

ते देवाच्या नियमांबद्दल विचारात होते, कैसराच्या नाही. ह्याचे भाषांतर ‘’आपले नियम शास्त्र ह्याला परवानगी देते का.

कैसर

कैसर हा रोमी सरकारचा अधिकारी असल्याने, रोमी शासनाचा संदर्भ ते कैसराच्या नावाने देऊ शकत होते. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)