Door43-Catalog_mr_tn/LUK/20/19.md

3.0 KiB
Raw Permalink Blame History

त्यांनी त्यांच्यावर हात टाकायचे ठरवले

‘’येशूला अटक करण्याचा मार्ग ते शोधू लागले. ‘’कोणावर तरी हात टाकणे’’ हा एक रूपक अलंकार आहे ज्याचा अर्थ म्हणजे ‘’अटक.

त्याच घटकेला

‘’लगेच’’

त्यांना लोकांचे भय वाटले

म्हणूनच त्यांनी येशूला लगेच अटक केली नाही ह्याचे हे कारण आहे. लोकांनी येशूचा सन्मान केला, आणि धार्मिक पुढार्यांना भीती वाटत होती की जर त्यांनी येशूला अटक केली तर लोक त्यांना काय करतील, काही भाषांतरात हे अधिक स्पष्ट केले जात आहे: ‘’पण लोकांचे त्यांना भय वाटत असल्याने त्यांनी त्याला अटक केली नाही. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)

त्यांनी हेर पाठवले

‘’शास्त्री आणि मुख्य याजक ह्यांनी येशूवर पाळत ठेवण्यासाठी हेर पाठवले’’

की त्यांना त्याच्या बोलण्यात दोष आढळावा

‘’येशूने काहीतरी वाईट बोलण्याचा दोष त्याच्यावर त्यांना लावायचा होता’’

त्याला धरून द्यावे म्हणून

‘’त्याला आणण्यास’’ किंवा ‘’जेणेकरून ते त्याला त्याच्या हातात देऊ शकतील’’

अधिपती आणि सुभेदार ह्यांच्या अधिकारास आणि सत्तेच्या अधीन व्हावे म्हणून

‘’शासन’’ आणि ‘’अधिकार’’ हे एकच गोष्ट बोलण्याच्या दोन वेगळ्या पद्धती आहेत. एक किवा दोन प्रदर्शने घेऊन त्याचे भाषांतर करता येते. येशूला सुभेदाराच्या स्वाधीन करण्याचे कारण अधिक स्पष्ट करता येते: ‘’जेणेकरून सुभेदार येशूला शिक्षा देईल.