Door43-Catalog_mr_tn/LUK/17/34.md

3.8 KiB
Raw Permalink Blame History

(येशू बोलत राहतो.)

त्या रात्री

जर मनुष्याचा पुत्र रात्रीच्या समयी आला तर काय होईल ह्याचा संदर्भ त्याच्याशी आहे.

एका बाजेवर दोघे असतील

ही एक काल्पनिक परिस्थिती आहे ज्यात दोघे जण एका बाजेवर काय करतील ह्याबद्दल सांगतात. ह्याचे भाषांतर ‘’एका बाजेवर दोघे जण. (पहा: काल्पनिक परिस्थिती)

बिछाना

‘’कोच’’ किंवा ‘’बाज’’

एकाला घेतले जाईल आणि दुसरा राहील

‘’एकाला घेतले जाईल आणि दुसरा मागे राहील. एका क्रियाशील क्रियापदाने त्याचे भाषांतर ‘’देव एका माणसाला घेऊन दुसऱ्याला मागे ठेवेल किंवा ‘’देवदूत एकाला घेतील आणि दुसऱ्याला मागे ठेवतील. असे करता येते. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

दोन स्त्रिया एकत्र दळीत बसतील

एक एका काल्पनिक परिस्थिती आहे ज्यात एकच वेळी दोन स्त्रिया काय करतात हे सांगितले जाते. ह्याचे भाषांतर ‘’दोन स्त्रिया एकत्र दळत बसतील.

काही भाषांतरांमध्ये ‘’दोन लोक त्या शेतात असतील; एकाला घेऊन दुसर्याला ठेवतील असे केले जातील.

लूकच्या उत्तम हस्तलिखित प्रतींमध्ये ह्या वाक्याचा समावेश नाही.

कोठे, प्रभू?

‘’प्रभू, हे कोठे घडेल? (युडीबी)

जिथे शरीर आहे, तिकडे एकत्र गिधाड जमतील

असे दिसते की ही एक म्हण आहे ज्याचा अर्थ ‘’हे स्वाभाविक होईल’’ किंवा ‘’ते कधी होईल ते तुम्हाला कळेल. ह्याचे भाषांतर देखील एका उपमा अलंकाराने होऊ शकते: ‘’गिधाड एकत्र जमणे दाखवते की तिथे एक मृत शरीर आहे, म्हणून ह्या गोष्टी देखील दाखवतात की मनुष्याचा पुत्र प्रगट होईल. (पहा: म्हण)

गिधाडे

हे मोठे पक्षी असतात जे एकत्र उडतात आणि त्यांना सापडणार्या मृत प्राण्याचे मांस खातात. अशा रीतीने तुम्ही पक्ष्यांचे वर्णन किंवा एका स्थानिक पक्ष्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दाने करू शकतात.