Door43-Catalog_mr_tn/LUK/17/17.md

3.5 KiB
Raw Permalink Blame History

येशूने उत्तर देत, म्हंटले

ह्याचे भाषांतर येशू त्या लोकसमुदायाला म्हणाला. त्या माणसाने काय केले ह्याला येशूने प्रतिसाद दिला, पण तो त्याच्या भोवती असलेल्या लोकांशी बोलत होता.

दहा बरे झाले नव्हते काय?

पहिल्या तीन अभिप्रेत प्रश्नांपैकी हा पहिला प्रश्न आहे. ह्याचा वापर येशूने त्या लोकांना दहा पैकी केवळ एकच देवाचे गौरव करण्यास परत आला हे सांगून तो किती आश्चर्यचकित आणि निराश होता हे दाखवले. ह्याचे भाषांतर ‘’दहा जण बरे झाले’’ किंवा ‘’देवाने त्या दहा पुरुषांना बरे केले. (पहा: अभिप्रेत प्रश्न अंड कर्तरी किंवा कर्मणी)

ते नऊ कोठे आहेत?

ह्या अभिप्रेत प्रश्नाचे भाषांतर ‘’इतर नऊ जणांनी देखील, तिकडे परत यायचे होते’’ किंवा ‘’ते नऊ का परत आले नाहीत? असे केले जाते.

ह्या अनोळख्या व्यक्ती शिवाय देवाचे गौरव करण्यास परतले त्यात इतर कोणी नव्हते का?

ह्या अभिप्रेत प्रश्नाचे भाषांतर ‘’केवळ हाच माणूस देवाला गौरव देण्यास परत आला’’ किंवा ‘’दहा लोक बरे झाले, पण तरीही केवळ हाच अनोळखा माणूस येऊन देवाला गौरव देतो’’ किंवा ‘’हे खरे असेल का की ह्या अनोळख्या माणसाच्या व्यतिरिक्त कोणीही देवाचे गौरव करण्यास परत आले नाही?

हा अनोळखा

शोमरोनी लोकांना यहुदी नसलेले पूर्वज होते आणि यहुदी करत असे तसेच त्या रीतीने ते देवाची आराधना करत नव्हते. (पहा: शोमरोन, शोमरोनी)

तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे

‘’तुझ्या विश्वासामुळे तू बरा झाला आहे. ‘’विश्वासाची’’ कल्पना ह्याचे भाषांतर एका क्रियापदाने होते: ‘’तुम्ही विश्वास ठेवता म्हणून, तुम्ही बरे झाला आहात.