Door43-Catalog_mr_tn/LUK/17/11.md

2.6 KiB
Raw Permalink Blame History

असे झाले की

ह्या वाक्यांशाचा उपयोग गोष्टीचा नवीन भाग दाखवण्यास केला. जर तुमच्या भाषेत तसे करण्याचा मार्ग असेल तर , ह्या ठिकाणी तिकडे त्याचा वापर करा.

ते यरुश्लेमाच्या मार्गावर जात असताना

‘’ते यरुश्लेमाला प्रवास करत असताना’’

त्यांना तिकडे दहा कुष्ठरोगी भेटले

ह्याचे भाषांतर एका क्रियाशील क्रियापदाने करता येते: ‘’दहा पुरुष जे कुष्ठरोगी होते त्यांना भेटले’’ किंवा कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्यांना भेटले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्यांनी आपले आवाज उंच केले

ह्याचा अर्थ ‘’ते उंच आवाजाने बोलले’’ किंवा ‘’ते मोठ्याने बोलले.

गुरुजी

ज्या ग्रीक शब्दाचे गुरुजी म्हणून भाषांतर येथे केले तो ‘’गुरुजी ‘’साठी वापरलेला साधारण शब्द नाही. ह्या शब्दाचा संदर्भ ज्याला अधिकार आहे हे दर्शवतो, आणि जो इतरांची मालकी घेतो त्याला नाही. तुम्ही त्याचे भाषांतर ‘’मालक’’ किंवा ‘’मुकादम’’ म्हणून करू शकता किंवा अधिकारात असलेली व्यक्तीला संबोधण्यास जो शब्द वापरता जसे, महोदय , तो येथे वापरू शकता.

आमच्यावर दया करा

ह्याचे भाषांतर ‘’आम्हाला बरे करून कृपया आमच्यावर कृपा करा. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)