Door43-Catalog_mr_tn/LUK/17/07.md

3.2 KiB
Raw Permalink Blame History

(येशू आपल्या शिष्यांना शिकवत राहतो.)

पण तुमच्यातील कोण

‘’पण तुमच्यातील कोण’’ किंवा ‘’तर तुमच्यातील कोण’’ ही एका अभिप्रेत प्रश्नाची सुरुवात आहे. एक विधान म्हणून त्याचे भाषांतर ‘’जर तुमच्यातील एक’’ किंवा ‘’तुमच्यातील एक असे गृहीत धरा. हे कसे करावे ह्याचे उदाहरण म्हणून युडीबी मध्ये पहा. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

तुमच्यातील कोणाचा दास

जर एखादी परिस्थिती अचानक उद्भवली तर त्या लोकांमधील एक काय करेल असा प्रश्न येशू त्या जमावाला विचारत होता. ह्याचे भाषांतर ‘’पण तुमच्यातील कोण, तुम्हाला दास असेल तर.

जो दास नागरणी करतो किंवा मेंढरांना राखतो

‘’एक दास जो तुमच्या शेताची नांगरणी करतो किंवा जो तुमच्या शेताची काळजी घेतो’’

नांगरणे

‘’नांगरणी करणे’’ म्हणजे जमिनीचा थर हलवणे, किंवा त्या जमिनीत अरुंद खड्डे खणणे, आणि त्या द्वारे तिथे बिजांची रोपणी करणे.

पण तो त्याला म्हणणार नाही

हा एका अभिप्रेत प्रश्न आहे. ह्याचे भाषांतर ‘’पण त्या ऐवजी तुम्ही त्याला म्हणाल’’ किंवा ‘’त्या ऐवजी, तुम्ही त्याला हे म्हणाल . (पहा: अभिप्रेत प्रश्न)

तुझी कंबर बांधून माझी सेवा कर

‘’तुझे वस्त्र तुझ्या कंबरेच्या भोवती बांध आणि माझी सेवा कर’’ किंवा ‘’व्यवस्थित तयार होऊन माझी काळजी घे’’ लोक त्यांचे कपडे काळजीपूर्वक कंबरेच्या भोवती बांधतात जेणेकरून ते काम करत असताना ते त्यांच्या आमध्ये येणार नाहीत.

मग नंतर

‘’मग नंतर तुम्ही माझी सेवा केल्यावर’’