Door43-Catalog_mr_tn/LUK/16/22.md

2.6 KiB
Raw Permalink Blame History

(येशू ती गोष्ट सांगत राहतो.)

नंतर असे झाले की

ह्या वाक्यांशाचा उपयोग गोष्टीची नवीन सुरुवात दर्शवतो. जर तुमच्या भाषेत तसे करण्याचा मार्ग असेल, तर इकडे तो करण्याचा विचार तुम्ही करा.

आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन बसवले

‘’आणि देवदूतांनी लाजरला अब्राहामाच्या उराशी नेले’’

अब्राहामाचे उर

असे दिसते की अब्राहाम आणि लाजर मेजवानी करताना एकमेकांच्या शेजारी भोजनास बसले, आणि लाजरचे डोके अब्राहामाच्या छातीच्या जवळ होते. आमंत्रित पाहुण्यांसाठी मेजवानी करण्याची ही ग्रीक पद्धत होती. ह्या वाक्यांशाचा उपयोग ‘’अब्राहामाचे उर’’ किंवा ‘’अब्राहामाच्या शेजारी’’ किंवा ‘’अब्राहामाच्या कडेलाबसून’’ किंवा ‘’अब्राहामाच्या शेजारी बसून.

तो छळ सहन करत असताना

‘’जिथे त्याला सतत यातना झाल्या’’ किंवा ‘’जेव्हा त्याला घोर वेदना होत होत्या’’

त्याने आपले डोळे वर केले

हा एक रूपक अलंकार आहे ज्याचा अर्थ ‘’त्याने वर पाहिले’’ असा आहे. (पहा: रूपक अलंकार)

आणि लाजर त्याच्या उराशी

ह्याचे भाषांतर ‘’लाजर एकदम अब्राहामाच्या कडेला बसून’’ किंवा ‘’आणि लाजर त्याच्या अगदी जवळ बसून’’ किंवा ‘’आणि लाजर त्याच्या बरोबर.