Door43-Catalog_mr_tn/LUK/16/19.md

4.1 KiB
Raw Permalink Blame History

(येशू बोलत राहतो.)

कोणीएक श्रीमंत माणूस

ही खरी कोणी व्यक्ती होती का हे स्पष्ट नाही, का केवळ एक गोष्ट होती ज्याचा उपयोग येशूने तो मुद्दा स्पष्ट करण्यासाठी केला.

जो जांभळे व तलम वस्त्रे घालत होता

‘’ज्याने तलम वस्त्राने आणि जांभळ्या रंगाने बनवलेले कपडे घातले’’ किंवा ‘’ज्याने खूप महागडे कपडे घातले. जांभळा रंग आणि तलम वस्त्र हे खूप महाग होते.

तो रोज त्याच्या मोठ्या धनाचा लाभ घेत होते

ह्याचे भाषांतर ‘’रोज सण साजरा करत होते’’किंवा ‘’रोज महागडे अन्न खाणे त्याला आवडत होते’’ किंवा ‘’त्याने खूप पैसा खर्च करून त्याला हवे ते विकत घेतले.

कोणीएक लाजार नामक दरिद्री त्याच्या दरवाजाच्या जवळ बसवला गेला

‘’लोकांनी लाजर नामक एका दरिद्री व्यक्तीला त्याच्या दरवाज्याजवळ बसवले’’

दरिद्री

‘’एक गरीब माणूस ज्याला अन्नासाठी लोकांपुढे भिक मागावी लागत होती’’

त्याच्या दरवाज्याच्या जवळ

‘’श्रींमंत माणसाच्या दरवाज्याच्या जवळ’’ किंवा ‘’श्रीमंत माणसाच्या मालमतेच्या प्रवेश द्वारात’’

त्याचे शरीर फोड्यांनी भरले होते

‘’त्याच्या संपूर्ण शरीरावर फोड्या होत्या.

त्याला अन्न खायची खूप तीव्र इच्छा होती

‘’त्याला खायचे होते’’ किंवा ‘’त्याला खायची परवानगी मिळेल अशी त्याची इच्छा होती’’

जे त्या श्रीमंत माणसाच्या मेजावरून खाली पडले

ह्याचे भाषांतर ‘’जे काही तुकडे अचानक श्रीमंत माणूस जेवत असताना त्याच्या ताटातून खाली पडतील’’ किंवा ‘’जे उरलेले अन्न त्या श्रीमंत माणसाच्या मेजावरून फेकले जात होते.

आणि त्याच्या व्यतिरिक्त

ह्याचे भाषांतर ‘’त्यात भर म्हणून’’ किंवा ‘’देखील. म्हणजेच लाजर बद्दल जे सांगण्यात आले त्यानंतर जे येणार होते ते भयंकर होते.

कुत्री

कुत्री घाणेरडे प्राणी होते. लाजर खूप आजारी होता आणि तो त्या कुत्र्यांना त्याच्या जखमा आणि फोड्या चाटण्यापासून थांबवू शकत नव्हता.