Door43-Catalog_mr_tn/LUK/16/08.md

3.0 KiB
Raw Permalink Blame History

(येशू ती गोष्ट सांगत राहतो.)

त्या धन्याने .... वाहवा केली

ज्या देनेकर्याचे ऋण कारभाऱ्याने कमी केले त्याने कदाचित विचार केला असेल की धन्याने ते ऋण कमी केल्याचा आदेश दिला असेल, म्हणून त्यांनी धन्याचे उदार असण्यासाठी कौतुक केले.

वाहवा केली

‘’कौतुक’’ किंवा ‘’त्यांच्याबद्दल चांगले बोलले’’ किंवा ‘’मान्यता मिळवली’’

तो धूर्तपणे वागला

‘’तो शहाणपणाने वागला’’ किंवा ‘’त्याने एक योग्य गोष्ट केली’’

ह्या जगाचे पुत्र

ह्याचा संदर्भ त्या अनितीकारक कार्भार्याशी येतो ज्यांना देवाबद्दल काही माहित नाही व फिकीर नाही. ह्याचे भाषांतर ‘’ह्या जगातील लोक’’ किंवा ‘’जगिक लोक’’ असे देखील करता येते.

प्रकाशाचे पुत्र

ह्याचा संदर्भ नीतिमान लोकांशी आहे ज्यांच्याकडे लपवण्यासाठी काहीच नसते. ह्याचे भाषांतर ‘’प्रकाशाचे लोक’’ किंवा ‘’जे लोक प्रकाशात राहतात असे देखील करता येते.

आणि मी तुम्हाला म्हणतो

‘’मी’’ ह्याचा संदर्भ येशुशी आहे. येशूने ती गोष्ट बोलण्याचे संपवले. तो वाक्यांश ‘’मी तुम्हाला म्हणतो’’ त्या बदलाला दर्शवतो जो लोकंना त्यांच्या जीवनात कसा त्याचे अवलंबन करावे हे सांगतात.

जगिक धन

ह्याचा संदर्भ भौतिक धनाशी आहे. त्यात वस्त्रे, अन्न, पैसा, अनमोल गोष्टी ह्यांचा समावेश असतो.

सार्वकालिक वस्तीस्थाने

ह्याचा संदर्भ स्वर्गाशी आहे, जिथे देव राहतो.