Door43-Catalog_mr_tn/LUK/10/13.md

4.7 KiB
Raw Permalink Blame History

(त्या सत्तर (बहात्तर) शिष्यांशी बोलून झाल्यावर वळून तीन शहरतील लोकांशी बोलतो.)

हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार

येशू असे बोलला जणू काही खोराजिना आणि बेथसैदा त्यांचे ऐकत होते, पण ते ऐकत नव्हते. (पहा: परोक्ष संबोधन)

जर तुमच्यात जी पराक्रमाची कृत्ये घडली तर

युडीबी मध्ये आहे तसे ह्याचे भाषांतर एका कर्तरी क्रियापदाने होऊ शकते : ‘’मी जे चमत्कार तुमच्यासाठी केले ते. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ते सोर आणि सिदोन मध्ये जर केले असते

ह्याचे भाषांतर एका कर्तरी क्रियापदाने होऊ शकते :’’जर कोणीतरी ते सोर आणि सिदोन मध्ये केले असते.

त्यांनी खुप आधी पश्चाताप केला असता

‘’त्या ठिकाणी दुष्ट लोकांनी त्यांच्या पापांसाठी ते क्षमस्व आहे असे दाखवले असते’’ (युडीबी)

गोनताट व राख अंगावर घेऊन

‘’गोनताट नेसून राखेत बसेल असते. जेव्हा लोक खूप दुखी असत, ते खाज सुटणाऱ्या कडक कपड्यांचे वस्त्र घालत, आणि त्यांच्या डोक्यावर राख टाकून, त्यात बसले देखील असते. जर त्यांनीदेवाच्या विरुद्ध पाप केले तर तेव्हा देखील त्यांनी असे केले असते.

तुमच्यापेक्षा... सोर आणि सिदोन साठी हे अधिक सोपे होईल

‘’सोर आणि सिदोन येथील लोकांच्या पेक्षा डे तुम्हाला अधिक घोर शिक्षा करेल. युडीबी मध्ये आहे तसे ह्याचे कारण अधिक जास्त येथे स्पष्ट करता येते: ‘’तुम्ही मला चमत्कार करताना पाहिले तरीही पश्चाताप करून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही! (पहा: स्पष्ट आणि पूर्ण माहिती)

न्यायाच्या दिवशी ‘’त्या अंतिम दिवशी जेव्हा देव सर्वांचा न्याय करेल’’ (युडीबी)

आणि तू, कफरनहूम

कफरनहूम शहरातील लोकांशी आता येशू बोलत आहे, जणूकाही ते त्याचे ऐकतच आहेत, पण ते ऐकत नव्हते.

तुम्हाला आकाशापर्यंत चढवले जाईल असा विचार करू नका

हा एक अभिप्रेत प्रश्न आहे ज्यात खोराजिनातील लोकांना येशू त्यांच्या गर्वासाठी दटावत आहे. (पहा: अभिप्रेत प्रश्न) ह्याचे भाषांतर एका कर्तरी क्रियापदाने ‘’तू स्वर्गात जाशील’’ किंवा ‘’देव तुमचा सन्मान करेल असा विचार तुम्ही करता का? (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्याला चढविले जाईल

‘’त्याचा सन्मान केला जाईल. (पहा: शब्दप्रयोग)