Door43-Catalog_mr_tn/LUK/08/49.md

1.0 KiB
Raw Permalink Blame History

(येशूचे त्या स्त्रीशी बोलून झाल्यावर याईराच्या घरातून एक निरोप्या येतो.)

तो बोलत असतानाच

‘’येशू त्या स्त्रीशी बोलत असताना’’

सभास्थानाचा अधिकारी

ह्याचा संदर्भ याईराशी आहे. स्थानिक सभास्थानात तो एक अधिकारी होता.

त्याने उत्तर दिले

‘’येशूने याईराला उत्तर दिले. येशू त्या सभास्थानातील अधिकाऱ्याशी बोलत होता, निरोप्याशी नाही.

तिचा बचाव होईल

‘’ती बरी होईल’’ किंवा ‘’ती पुन्हा जगेल’’ (युडीबी)