Door43-Catalog_mr_tn/LUK/08/28.md

2.2 KiB
Raw Permalink Blame History

जेव्हा त्याने येशूला पाहिले

‘’जेव्हा त्या भूतग्रस्त माणसाने येशूला पाहिले’’

तो ओरडला

‘’तो जोरात ओरडला’’ किंवा ‘’किंचाळला’’

त्याच्यापुढे पडला

‘’जमिनीवर येशुसमोर पडला. तो काही एकाएकी पडला नाही. तो येशूला घाबरला म्हणून त्याने तसे केले.

मोठ्या आवाजाने म्हणाला

‘’मोठ्याने तो म्हणाला’’ किंवा ’’त्याने मोठ्याने ते म्हंटले’’

तू मध्ये एका पडतो

ह्याचे भाषांतर ‘’तू मला का त्रास (पीडा) देत आहे’’ असे करता येते.

पुष्कळ वेळा त्याला पछाडले होते

‘’बरेचदा त्याने त्या माणसाला पकडले. ह्याचे भाषांतर ‘’अनेक वेळी ते त्याच्यात गेले’’ असे देखील होऊ शकते. येशू त्या माणसाकडे जाण्याच्या आधी त्या भुताने काय केले हे ह्या आणि पुढील विधानातून कळेल.

त्याला साखळ्यांनी व बेड्यांनी पहाऱ्यात ठेवले, असतानाही

ह्याचे भाषांतर क्रियाशील क्रियापादांनी होऊ शकते: ‘’जरी लोकांनी त्या माणसाला बेड्या आणि साखळ्या बांधून पहाऱ्यात ठेवले. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)