Door43-Catalog_mr_tn/LUK/07/31.md

2.4 KiB
Raw Permalink Blame History

(येशू त्याला आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला नाकारलेल्या लोकांशी बोलत आहे.)

मी कशाशी तुलना करू (कोणाची उपमा देऊ)

एका अभिप्रेत प्रश्नाची ही सुरुवात आहे. येशूने त्याचा वापर तो जी तुलना करणार होता त्याची ओळख करण्यासाठी वापरला. ह्या संपूर्ण प्रश्नाचे भाषांतर ,’’ह्या पिढीची तुलना मी अशी करेल. ते अशा सारखे आहेत. (पहा :अभिप्रेत प्रश्न)

ह्या पिढीचे लोक

‘’जे लोक आता जगतात’’ किंवा ‘’हे लोक’’ किंवा ‘’तुम्ही ह्या पिढीतील लोक’’

ते त्यासारखे आहेत

ही येशूच्या तुलनेची सुरुवात आहे. हा एक उपमा अलंकार आहे (पहा: उपमा अलंकार) येशूने म्हंटले की ह्या पिढीचे लोक लेकरांच्या सारखे होते जे इतर लेकरे कसे वागतात त्याच्याशी कधीही तृप्त होत नसत.

बाजारपेठ

हे एक मोठे, खुले क्षेत्र होते जिथे लोक त्यांचे सामान विकण्यास आणत असे.

पावा

हे एक लांब, संगीताचे वाद्य आहे ज्याच्यावर किंवा त्याच्यात हवा फुंकून ते वाजवले जाते.

आणि तुम्ही नाचला नाही

‘’पण तुम्ही त्या संगीताच्या सुरावर नाचला नाही’’

आणि तुम्ही रडला नाही

‘’पण तुम्ही आमच्याबरोबर रडला नाही’’