Door43-Catalog_mr_tn/LUK/07/27.md

3.2 KiB
Raw Permalink Blame History

(येशू लोकांशी बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या बद्दल बोलतो.)

ज्याबद्दल शास्त्रलेख आहे तो हा आहे

‘’संदेष्ट्यांनी ज्याच्या बद्दल लिहून ठेवले तो हा आहे’’ किंवा ‘’खूप पूर्वी संदेष्ट्यांनी ज्याच्या बद्दल लिहिले तो योहान आहे’’

पहा...

ह्या वचनात, येशू मलाखी संदेष्ट्याच्या पुस्तकातून बोलत आहे आणि मलाखी ३:१ मधील लेखणीमध्ये जो आहे तो योहान संदेष्टा होता.

तुझ्या मुखासमोर

‘’तुझ्या पुढे’’ किंवा ‘’तुझ्या आधी जाण्यासाठी. ‘’तू’’ हा शब्द एकवचनी आहे,कारण देव त्या उद्गारात मसिहाशी बोलत होता. (पहा: ‘तू’ चे स्वरूप)

मी तुम्हाला म्हणतो

येशू त्या लोकसमुदायाशी बोलत होता, म्हणून ‘’तू’’ हे येथे अनेकवचनी स्वरूप आहे. येशू पुढे जी आश्चर्याची गोष्ट सांगणार होता त्यावर भर देण्यासाठी तो हे बोलला.

स्त्रियांमध्ये जन्मलेल्यांपैकी

‘’ज्या सर्वांना एक स्त्रीने जन्म दिला आहे. हा एका भाषेचा अलंकार आहे जो सर्व लोकांशी संदर्भित आहे. ह्याचे भाषांतर ‘’जे सर्व लोक ह्या पृथ्वीवर होऊन गेले.

योहानाच्या पेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही

ह्याचे भाषांतर सकारात्मक रीतीने ‘’योहान हा सर्वश्रेष्ठ आहे असे होते.

देवाच्या राज्यात सर्वात कमी महत्वाची व्यक्ती

देव ज्या राज्याची स्थापना करेल त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीशी ह्याचा संदर्भ आहे. ह्याचे भाषांतर ‘’ज्याने देवाच्या राज्यात प्रवेश केला आहे.

तो आहे तो श्रेष्ठ आहे

‘’योहानाच्या पेक्षा अधिक उच्च अध्यात्मिक दर्जा’’