Door43-Catalog_mr_tn/LUK/07/24.md

3.2 KiB
Raw Permalink Blame History

(येशू लोकांशी बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या बद्दल बोलतो.)

टू बाहेर जाऊन काय पाहिले

येशूने तीन अभिप्रेत प्रश्नांमध्ये ह्या वाक्यांशाचा उपयोग लोकांनी बाप्तिस्मा करणारा योहान कसा होता ह्यावर विचार करण्यासाठी केला. ह्याचे भाषांतर ‘’तुम्ही पाहण्यासाठी बाहेर गेला का....? नक्कीच नाही! किंवा ‘’निश्चितच तुम्ही जाऊन बाहेर पाहिले नाही ....! (पहा: अभिप्रेत प्रश्न)

वार्याने हलवलेला बोरू

ह्या रूपक अलंकाराचे भाषांतर एका उपमा अलंकाराच्या प्रमाणे देखील होऊ शकते: ‘’एक माणूस जो वार्याने हलवलेल्या बोरू प्रमाणे होता. त्याची दोन भाषांतरे आहेत. १) बोरू वाऱ्याने सहज हलवण्यात येतात, म्हणून त्याचा संदर्भ जी व्यक्ती सहज मन बदलण्यास प्रेरित होते त्याच्याशी आहे. २) जेव्हा वारा सोसाट्याने वाहतो बोरू आवाज करतात, म्हणून त्यःचा संदर्भ अशा व्यक्तीशी आहे जो खुप बोलतो पण त्याच्या वाक्तृत्वाचा काहीच महत्वाचा परिणाम होत नाही (पहा: रूपक अलंकार)

तलम वस्त्रे धारण केलेले

‘’अगदी श्रींमंत कपडे घातलेले. श्रीमंत लोक अशा प्रकारचे कपडे घालतात.

राजांची दरबारे

एक दरबार हे मोठे, महागडे घर आहे ज्यात राजा राहतो.

पण

‘’जर तुम्ही ते पाहण्यास बाहेर गेला नाही, तर’’

मी तुम्हाला म्हणतो

येशू पुढे काय बोलणार आहे, त्याच्या महत्वावर भर देण्यासाठी तो असे म्हणतो.

संदेष्ट्याच्या पेक्षा अधिक

‘’एक साधारण संदेष्टा नाही’’ किंवा ‘’एका साधारण संदेष्ट्याच्या पेक्षा अधिक महत्वाचा’’