Door43-Catalog_mr_tn/LUK/04/25.md

3.6 KiB
Raw Permalink Blame History

(येशू त्या सभास्थानात लोकांशी बोलत राहतो.)

मी तुम्हाला सत्याने सांगतो

‘’मी तुम्हाला हे सत्याने सांगतो. पुढील येणाऱ्या विधानाच्या महत्त्वामुळे, सत्यामुळे,आणि अचूक्तेमुळे त्यावर भर देण्यासाठी त्या वाक्यांशाला वापरले जाते.

विधवा

ज्या स्त्रीचा पती मरण पावला तिला विधवा म्हणतात.

एलीयाच्या वेळी

ह्याचे भाषांतर ‘’जेव्हा एलिया त्या इस्रायेलात भविष्यवाणी देत होता. ज्या लोकांशी येशू बोलत होता त्यांन कळले असते की एलिया हा देवाचा एक संदेष्टा होता. जर तुमच्या वाचकांना हे कळले असते तर, युडीबी प्रमाणे ह्या पूर्ण माहितीला तुम्ही अधिक स्पष्ट करू शकता. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)

आकाश बंद होऊन जेव्हा पाऊस पडला नाही

ह्याचे भाषांतर ‘’जेव्हा आकाशातून काहीच पाऊस पडला नाही’’ किंवा ‘’जेव्हा काहीच पाऊस पडला नाही. हा तर एक रूपक अलंकार आहे. आकाश म्हणजे एक छत जे बंद झाल्यामुळे त्यावरील पाणी खाली येऊ शकत नव्हते. (पहा: रूपक अलंकार)

जेव्हा मोठा दुष्काळ पडला

‘‘जेव्हा खरीच पाण्याची टंचाई होती’’ किंवा ‘’जेव्हा लोकांकडे पुरेसे अन्न नव्हते. एक दुष्काळ म्हणजे मोठा काळ जेव्हा पिकं लोकांसाठी पुरेसे धान्य तयार करू शकत नाही.

सारफथ येथील विधवा

सारफाथ येथील शहरात राहणारे लोक परराष्ट्रीय होते, यहुदी नाही. ह्याचे भाषांतर सारफथ येथे राहणारी एक परराष्ट्रीय स्त्री. जे लोक येशूचे ऐकतील त्यांना कळेल की सारफथ येथील लोक परराष्ट्रीय होते. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)

सुरीयाचा नामान

एक सुरीयातील व्यक्ती ही सुरिया देशातील होती. सुरीयाचे लोक परराष्ट्रीय होते, यहुदी नाही. ह्याचे भाषांतर ‘’सुरीयातील परराष्ट्रीय नामान.