Door43-Catalog_mr_tn/LUK/04/20.md

2.7 KiB
Raw Permalink Blame History

मग त्याने तो ग्रंथपट बंद केला

मग येह्सुने तो ग्रंथपट गुंडाळून ठेवला’’

सभास्थानातील सहचर

ह्याचा संदर्भ एका सभास्थानातील कर्मचार्याशी आहे ज्याने खात्री केली की ज्या गुंडाळयात ती शास्त्रवचने होती त्यांनी ते बाहेर आणून योग्य काळजी आणि आदराने ठेवले.

त्यांच्यावर केंद्रित होते

‘’त्यांच्यावर केंद्रित होते’’ किंवा ‘’त्याच्याकडे पाहत होते’’

तुमच्या ऐकण्यात ह्याची पूर्तता झाली

ह्याचे भाषांतर ‘’शास्त्रवचनात जे घडणार होते असे म्हंटले गेले ते आता घडले आणि तुम्ही ते ऐकले. येशू म्हणत होता की तो त्याच्या कृतींनी आणि बोलण्याने त्याच वेळी ती भविष्यवाणी पूर्ण करत होता.

त्याच्या तोंडून येणाऱ्या कृपाळू शब्दांनी तो आश्चर्यचकित झाला

‘’तो ज्या काही कृपाळू गोष्टी बोलत होता त्यांनी तो आश्चर्यचकित झाला’’

हा योसेफाचा पुत्र नाही का?

ह्याचे भाषांतर ‘’हा योसेफाचा पुत्र नाही का? किंवा ‘’हा तर केवळ योसेफाचा पुत्र आहे ! किंवा ‘’योसेफ तर त्याचा केवळ पिता आहे! लोकांना वाटले की योसेफ येशूचा पिता होता. योसेफ काही धार्मिक पुढारी नव्हता, म्हणून त्याचा पुत्र त्याने जे केले त्यावर उपदेश दिला ह्यावर आश्चर्यचकित झाला. (पहा: अभिप्रेत प्रश्न).