Door43-Catalog_mr_tn/LUK/04/16.md

2.0 KiB
Raw Permalink Blame History

जिथे तो वाढला

ह्याचे भाषांतर ‘’जिथे त्याच्या आई वडिलांनी त्याला वाढवले’’ किंवा ‘’जिथे तो वाढला’’ किंवा ‘’तो लहान बालक म्हणून जिथे राहिला ते स्थान.

त्याच्या परिपाठाप्रमाणे

‘’जसे तो नेहमी करत असे. शब्बाथ दिवशी सभास्थानात जाने ही त्याची नियमित सवय होती.

यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला

ह्याचे भाषांतर देखील एका कर्तरी प्रयोगात केले जाते, जसे ‘’कोणीतरी त्याला यशया संदेष्ट्याची गुंडाळी दिली. (पहा कर्तरी किंवा कर्मणी)

संदेष्टा यशयाची गुंडाळी

ह्याचा संदर्भ यशायाच्या पुस्तकाशी आहे जे त्या गुंडाळीवर लिहण्यात आले. अनेक वर्षांच्या आधी, यशयाने ते शब्द लिहून ठेवले, आणि कोणीतरी दुसर्याने ते त्या गुंडाळीवर लिहून काढले.

ज्या ठिकाणी ते लिहिले गेले

‘’ज्या ठिकाणी गुंडाळीवर ते लिहिले गेले’’ किंवा ‘’त्या गुंडाळीतील स्थळ जिथे हे शब्द लिहिले गेले’’