Door43-Catalog_mr_tn/LUK/04/03.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

जर टू देवाचा पुत्र असशील

सैतान कदाचित येशूला तो देवाचा पुत्र आहे हे सिद्ध करण्याचे आवाहन देत होता.

हा धोंडा

सैतान हातात एक धोंडा धरून होता किंवा दूरवर त्या धोंड्याकडे बोट दाखवून बोलत होता.

असा शास्त्रलेख आहे

‘’असे शास्त्रवचनात लिहिले आहे’’ किंवा ‘’शास्त्रवचने म्हणतात’’ किंवा ‘’शास्त्रवचनात देवाने म्हंटले आहे. ह्याचा संदर्भ अनुवाद ८:३ मधून आहे.

मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही

ह्याचे भाषांतर ‘’लोक केवळ भाकरीवर जगू शकत नाही’’ किंवा ‘’केवळ अन्नावर लोक जगत नाही. ‘’भाकर’’ ह्या शब्दाचा संदर्भ संपूर्ण अन्नाशी येतो. (पहा: उपलक्षण अलंकार) ह्या ठिकाणी मुद्दा असा आहे की केवळ अन्न माणसाला जिवंत ठेवण्यासाठी पुरेसे नाही. लोकांनी देवाची आज्ञा पाळण्याची गरज आहे. येशू त्या धोंड्याला का भाकरीत बदलणार नाही ह्यासाठी तो शास्त्रवचनांचा संदर्भ देत आहे.