Door43-Catalog_mr_tn/LUK/02/25.md

1.8 KiB
Raw Permalink Blame History

धार्मिक

‘’देवाला समर्पित’’ किंवा ‘’देवाशी विश्वासू’’

इस्राएलचा सांत्वनदाता

ह्याचे भाषांतर ‘’जो इस्राएलचे सांत्वन करेल. ‘’मसीहा’’ किंवा ‘’ख्रिस्त’’ ह्यासाठी हे दुसरे नाव आहे.

पवित्र आत्मा त्यावर होता

‘’पवित्र आत्मा त्याच्याबरोबर होता. विशेष रीतीने देव त्याच्याबरोबर होता, आणि त्याच्या जीवनात देवाने त्याला सुज्ञान आणि दिशा दिली.

पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले

ह्याचे भाषांतर ‘’पवित्र आत्म्याने त्याला दाखवले’’ किंवा ‘’पवित्र आत्म्याने त्याला सांगितले.

त्याने प्रभू ख्रिस्ताला पाहिल्या शिवाय तो मरणार नाही

ह्याचे भाषांतर ‘’मरण्यापूर्वी तो प्रभू ख्रिस्ताला पाहील’’ किंवा ‘’तो प्रभू ख्रिस्ताला पाहील आणि मगच मृत्यू पावेल. ह्या ठिकाणी ‘’प्रभू’’ ह्या शब्दाचा संदर्भ देवाशी आहे.