Door43-Catalog_mr_tn/JAS/04/08.md

4.1 KiB

तुम्हाजवळ

तुम्ही हा शब्द याकोबाच्या प्रेक्षका संदर्भात वापरला आहे.परंतू विशेषत: जे आपल्या आत्म्याने गर्विष्ट आहेत आणि पश्चातापासाठी बोलावले आहेत.(पहा: “तू”चस्वरूप)

अहो, पापी लोकांनो तुमचे हात निर्मळ करा, आणि व्दिबुद्धीच्या लोकांनो

“हात निर्मळ करा”हे वाक्य दुसऱ्या रीतीने मांङल आहे “आपली अंत: करणे शुध्द करा” आणि “तुम्ही पापीजन”पुर्नरचना अशी केली आहे “ तुम्ही व्दिबुध्दीच्या”.(पहा: समांतर)

हात निर्मळ करा

संभाव्य अर्थ आहेत १)अशा व्यक्तीसाठी ज्याने आपली वागणूक आणि आपली कृती निर्मळ ठेवावी. २)अशा व्यक्तीसाठी ज्याने पश्चाताप करावा आणि आपली पापी वागणूक व कृतीची कबुली द्यवी.याचे भाषांतर असे करता येईल.”देवाला सन्मान मिळेल अशा मार्गाने वागा.” (पहा: अलंकारीक)

आपली अंत: करणे

इथे”अंत: करण”हा प्रतीशब्द व्यक्तीचे विचार आणि भावना यासाठी दिलेला आहे.त्याचे भाषांतर असे ही करता येईल.”तुमच्या विचारांनी देवाचा सन्मान करा.” व्दिबुध्दी

“व्दिबुध्दी” हा शब्द अलंकारीकरीत्या ज्या व्यक्तीचे विचार त्याव्दारे तो निर्णय घेऊ शकत नाही त्याच्या संदर्भात आहे.याचे भाषांतर असे करता येईल”व्दिबुध्दीचे लोक”किंवा “देवाची आज्ञा पाळायची की नाही याचा निर्णय घेऊ शकत नाही.”

कष्टी व्हा, रङा शोक करा

ह्याचे म्हणणे असे की, एकाच गोष्टीवर वेगेगळ्या प्रकारांनी भर दिला आहे याचे भाषांतर असे करता येईल की, ”अत्यतिक शोक करा”(पहा: व्दिअर्थी) तुमच्या हसण्याचा शोक होवो

तुमच्या आनंदाचा विशाद होवो.हे एकच गोष्ट प्रभावी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे जोर देऊन सांगण्यात आली आहे.याचे भाषांतर असे होऊ शकते”ताबङतोब तुमचे सर्व हसणे थांबवा आणि देवाकङे क्षमा मागा.”

प्रभूसमोर स्वत: ला नम्र करा

.”देवाकङे नम्र व्हा.” तो तुम्हास उंच करील

हा एक वाकप्रचार आहे ज्याचे भाषांतर असे करता येईल “तो तुमचा सन्मान करील.”(वाकप्रचार)