Door43-Catalog_mr_tn/JAS/04/04.md

4.6 KiB

अहो अविश्वासणाऱ्यांनो

हे एक रुपक असून,
जे विश्वासणारे देवाची आज्ञा पाळत नाही याची तुलना जी स्त्री दुसऱ्या पुरुषाबरोबर शरीरसंबंध ठेवते जो तिचा पती नाही अश्याशी तुलना केली आहे.याचे भाषांतर अस होऊ शकते “तुम्ही देवाशी निष्ठावंत नाही!”(पहा: रूपक)

तुम्हाला माहित नाही काय

हा अलंकारीक प्रश्र याकोब प्रेक्षकांना शिकविण्यासाठी वापरत आहे.पर्यायी भाषांतर “तुम्हाला माहित आहे.”(वक्तृत्वकलेविषयीचा प्रश्र)

जगाबरोबर मैत्री

“जगाबरोबर मैत्री”जगाच्या प्रणालीप्रमाणे आणि वागणूकीत सहभागी होऊन त्यांच्याशी ओळख याच्या संदर्भात आहे.(पहा: रूपक)

जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी आहे.पर्यायी

भाषांतर: ”देवाचा जे अपमान करतात त्यासारखी कृती करणे हे देवाला विरोध करण्यासारखे आहे.”

जगाचा मित्र होणे

“जे देवाचा अनादर करतात तसे वागणे”

किंवा शास्त्राचे वचन व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटते काय?

याकोब आपल्या प्रेक्षकांवर प्रभाव पाङण्यासाठी हा वक्तृत्वकलेसंबंधीचा प्रश्र विचारतो.याच भाषांतर अस होऊ शकत “शास्त्रवचन हे सत्य आहे”

देवाने आपल्यामध्ये जो आत्मा ठेवला आहे तो आता उत्कंठतेने

भरलेला आहे

ह्या वचनात अनेक समस्येच निराकरण झालेल नाही. इथे “आत्मा””मनुष्याचा आत्मा”की”पवित्र आत्मा” ”आहे? देवाचा किंवा“खोल उत्कंठ” इच्छा करणारा आत्मा? “खोल उत्कंठ” दुष्ट किंवा चांगला आहे? अलंकारीक प्रश्र “होय” किंवा “नाही”उत्तराची अपेक्षा करतात की नाही? हे अनिश्तितेने निदान पाच संभाव्य अर्थ येऊ शकतात १)”होय, देवाने जो आत्मा मनुष्यात ठेवला आहे तो उत्कंठतेने त्याची वाट पाहतो. किंवा २)“होय देवाने आमच्यामध्ये ठेवलेल्या पवित्र आत्म्याची देव उत्कंठ इच्छा बाळगतो.”३)

“होय” जो मानवी आत्मा देवाने आमच्यात ठेवला आहे त्यात वाइट इच्छा आहेत.”४)“होय” जो पवित्र आत्मा आमच्यामध्ये देवाने

ठेवलेला आहे तो आमच्यासाठी उत्कंठ इच्छा बाळगतो.” ५)”नाही जो पवित्र आत्मा देवाने आम्हाला दिलेला आहे तो ईर्षावान नाही.आम्ही सुचवतो की तुमचे वाचक जे दुसरे भाषांतर वापरतात त्यात जो अर्थ आहे त्याचा उपयोग करावा.