Door43-Catalog_mr_tn/GAL/06/17.md

3.0 KiB
Raw Permalink Blame History

ह्यापुढे

ह्याच अर्थ म्हणजे ‘’शेवटी’’ किंवा ‘’मी ह्या पत्राचा शेवट करतो तसे.

कोणी मला त्रास न देवो

ह्याचा अर्थ म्हणजे १) पौल गलतीकरांना त्याला त्रास न देण्याची आज्ञा देत आहे, मी तुम्हाला ही आज्ञा देत आहे : मला त्रास देऊ नका, किंवा २) पौल गलतीकरांना सांगत आहे की तो सर्व लोकांना त्याला त्रास न देण्याची आज्ञा देत आहे, किंवा ३) पौल ह्या ठिकाणी एक इच्छा व्यक्त करत आहे,’’कोणीच मला त्रास देऊ नये अशी माझी इच्छा आहे.

मला त्रास

ह्याचा अर्थ म्हणजे १)’’ह्या बाबत माझ्याशी बोलत राहणे’’ (युडीबी) किंवा २)’’मला कठीणतेत भाग पाडले’’ किंवा ‘’मला कठीण काम दिले.

मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करून आहे

‘’येशूच्या प्रती केलेय सेवेच्या बऱ्या झालेल्या जखमा अजूनही माझ्या शरीरावर आहेत’’ किंवा ‘’मी येशूच्या मालकीचा आहे म्हणून बऱ्या झालेल्या जखमा अजूनही माझ्या शरीरावर आहेत’’

खुणा

हे म्हणजे १)युद्धातील शिपायाला झालेल्या जखमांचे व्रण किंवा एक धोकादायक काम करताना जसे सेवकाला जखमांचे व्रण किंवा २) गुलामाचे व्रण . (पहा: रूपक अलंकार)

आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर

‘’मी अशी प्रार्थना करत आहे की प्रभू येशू तुमच्या आत्म्याशी दया प्रदान करेल’’

बंधुजनहो

‘’बंधू आणि भगिनी’’ किंवा ‘’देवाच्या कुटुंबातील सहसदस्य’’