Door43-Catalog_mr_tn/GAL/05/05.md

3.3 KiB
Raw Permalink Blame History

कारण

‘’हे ह्यामुळे आहे. हे वचन तुम्हाला चौथ्या वचनातील ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे...तुम्ही कृपेपासुन अंतरले आहात’’ ह्याचे कारण देते.

आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नितीमत्वाची आशा धरून वाट पाहत आहो

ह्याचा अर्थ १) ‘’नितीमत्वाच्या आशेसाठी आपण विश्वासाने थांबून राहत आहोत’’ किंवा २) ‘’विश्वासाने येणाऱ्या नितीमत्वाच्या आशेसाठी आपण थांबून आहोत’’

आपण

ह्याचा असंदर्भ पौल आणि जे लोक ख्रिस्ती लोकांच्या सुंतेचा विरोध करतात त्यांच्याशी आहे. कदाचित ह्यात तो गलतीकरांचा देखील समावेश करत आहे. (पहा: समाविष्ट)

वाट पाहत आहोत

आशेने, आनंदाने, धीराने

नितीमत्वाची आशा

‘’देव आपल्याला नीतिमान ठरवेल ह्याची आपल्याला आशा आहे’’

सुंता होण्यात किंवा न होण्यात

यहुदी असण्यात किंवा नसण्यात हा एक अजहल्लक्षण अलंकार आहे. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

तर प्रितीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास

‘’तर त्या ऐवजी, देव आपला त्यावरील विश्वासाच्या संबंधी काळजीत आहे, ज्याचे प्रदर्शन इतरांवर केलेल्या प्रेमाने होते’’

तुम्ही चांगले धावत होता

‘’येशूने जे शिकवले ते तुम्ही आचरणात आणत होता’’

तुम्हाला पाचारण करणाऱ्याची ही वृद्धी नव्हे

‘’जो तुम्हाला तसे करण्यास भाग पाडतो तो देव नाही, जो तुम्हाला पाचारण करतो’’ त्याचे लोक होण्यास

भाग पाडणे

एखाद्या व्यक्तीला जे खरे वाटते ते सोडून तुम्ही जे सांगत आहात ते खरे आहे ह्यावर विश्वास ठेवण्यास आणि तशी कृती करण्यास ह्याच आर्थ आहे.