Door43-Catalog_mr_tn/GAL/03/01.md

4.0 KiB
Raw Permalink Blame History

कोणी तुम्हाला भुरळ घातली आहे?

पौल ह्या ठिकाणी एक विरोधाभास आणि अभिप्रेत प्रश्न वापरत आहे की गलतीकर असे वागत आहेत जणूकाही कोणीतरी त्यांच्यावर रोख ठेवला आहे. त्याचा तसा अजिबात विश्वास नाही. (पहा: विरोधाभास, अभिप्रेत प्रश्न)

दुष्ट नजर

हे पद जादूटोना आणि भुते काढण्याशी संबंधित आहे. ह्या ठिकाणी अलंकारिक रीतीने तो वापरला आहे. जर तुमच्या भाषेत असे वर्णन करण्याचा मार्ग असेल तर, इकडे तो वापरा.

वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ह्यांच्यापुढे वर्णन करून ठेवला होता?

हा एका दुसरा अभिप्रेत प्रश्न आहे: ‘’मी तुम्हाला येशू ख्रिस्ताला कसे खिळले हे नक्की सांगितले आहे’’ (युडीबी)

मला इतकेच तुमच्यापासून समजून घ्यायचे आहे

वचन १ मधून हा विरोधाभास चालू राहतो. पौल जे प्रश्न विचारत आहे त्यासाठी ही उत्तरे आहेत. तुम्ही भाषांतर करता तसे, ह्यावरच केवळ भर द्या, कारण हे शब्द वाक्यातील सर्वात महत्वाचे आहे.

हे

ह्या शब्दाचा संदर्भ पुढील तीन प्रश्नांशी आहे

तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला, इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यावयाचे आहे

‘’तुम्हाला आत्मा मिळाला, नियमशास्त्रात जे आहे त्यामुळे नाही, तर तुम्ही जे ऐकले त्यावर विश्वास ठेवल्याने होते. एक प्रश्न म्हणून ह्या अभिप्रेत प्रश्नाचे भाषांतर करा, कारण वाचक ह्याठिकाणी प्रश्नाची अपेक्षा आकारत आहे. आणि, ह्याची खात्री बाळगा की वाचकाला प्रश्नांचे उत्तर माहित असते ‘’तुम्ही जे ऐकले त्यावर विश्वास ठेवल्याने’’, ‘’नियमशास्त्र जे सांगते त्यानुसार नाही.

तुम्ही इतके बुद्धीहीन आहात काय?

हा अभिप्रेत प्रश्न केवळ ‘’तुम्ही (अनेकवचनी) बुद्धिहीन आहात ! (युडीबी), हे दाखवते की गलतीकर बुद्धिहीन असताना पौल आश्चर्यचकित आणि क्रोधिष्ट देखील आहे.

देहस्वभावाने

‘’तुमच्या स्वतःच्या कार्यांनी’’