Door43-Catalog_mr_tn/EPH/01/22.md

2.1 KiB
Raw Permalink Blame History

देवाने ठेवले

‘’देवाने ठेवले’’ (युडीबी) किंवा ‘’देवाने मांडले’’

सर्व काही ख्रिस्ताच्या पायाखाली

ह्यात ख्रिस्ताचे प्रभुत्व, अधिकार आणि सामर्थ्य ह्यांचे दर्शक आहे. पर्यायी भाषांतर: ‘’ख्रिस्ताच्या सामर्थ्याच्या अंतर्गत सर्व गोष्टी’’. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून एक मानवी शरीर म्हणून, जसे मस्तक शरीरावर सत्ता गाजवतो, तसेच ख्रिस्त देखील मंडळीच्या शरीराचे मस्तक आहे. (पहा: रूपक अलंकार)

मंडळीतील सर्व गोष्टींचे मस्तक

‘’मस्तक’’ म्हणजे एक पुढारी किंवा ज्याच्या हातात गोष्टी असतात. पर्यायी भाषांतर: ‘मंडळीतील सर्व गोष्टींचा अधिकारी’’.

जे त्याचे शरीर आहे

मंडळीला ख्रिस्ताचे शरीर असे म्हंटले जाते

जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ती भरलेली आहे.

ख्रिस्त त्याच्या सामर्थ्याने आणि जीवनाने मंडळीला भरतो जसे तो सर्व गोष्टींना जीवन देऊन त्या राखून ठेवतो.