Door43-Catalog_mr_tn/ACT/26/27.md

1.3 KiB

पौल त्याचे भाषण पुढे चालू ठेवतो

तुम्ही संदेष्ट्यांवर विश्वास ठेवता का?

यहूदी संदेष्ट्यांनी काय सांगितले ह्यावर अग्रिप्पा अगोदरच विश्वास ठेवीत आहे ह्याची त्याला आठवण करून देण्यासाठी पौलाने हा प्रश्न विचारला. म्हणून पौल येशूविषयी जे सांगत आहे ते अग्रिप्पाने मान्य करावे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

मी ख्रिस्ती व्हावे म्हणून थोडक्यानेच तू माझे मन वळवितोस?

अग्रिप्पा असे म्हणतो की अशा लघु भाषणाने पौल त्याला ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करू शकत नाही. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)