Door43-Catalog_mr_tn/ACT/22/03.md

3.1 KiB

पौल लोकांशी त्याचे बोलणे पुढे चालू ठेवीत आहे

ह्या शहरांत गमलिएलाच्या चरणांजवळ मी सुशिक्षित झालो

"येथे ह्या शहरामध्ये मी गुरु गमलिएलाचा विद्यार्थी होतो"

मला आपल्या वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे कडकडीत रीतीने शिक्षण मिळाले

आपल्या वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे कडकडीत रीतीने शिक्षण मला त्यांनी दिले" किंवा "जे शिक्षण मला प्राप्त झाले त्याने आपल्या वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे तंतोतंत अनुसरण केले होते" (पाहा: कर्तरी आणि कर्मणी)

मी देवाविषयी आवेशी आहे

"देवाची जी इच्छा आहे असे मला वाटत होते ती पूर्ण करण्यासाठी मी फार आवेशपूर्ण कार्य करावयाचे आहे." किंवा "मी देवाच्या प्रती सेवेबद्दल फार उत्कट आहे"

जसे तुम्ही सर्व किंवा जसे तुम्ही आज आहा

"तुम्ही आज आज जसे सर्व आहा त्याचप्रमाणे" किंवा "तुम्ही आज जसे आहा त्याचप्रमाणे" पौल जमावाशी त्याची तुलना करीत आहे.

हा मार्ग

पेन्टेकॉस्ट नंतर हे नांव यरूशलेमेतील विश्वासणाऱ्यांच्या स्थानिक मंडळीस दिले गेले होते. (पाहा: प्रेषित. ९:२).

मृत्यू येईपर्यंत

ह्या मार्गाचा ज्यांनी अवलंब केला होता त्यांना ठार मारण्याची पौलाची इच्छा होती.

साक्षी आहे

"साक्षी देतात" किंवा "निक्षून सांगतात"

त्यांच्यापासून पत्रें घेऊन

"प्रमुख याजक आणि वडील जन ह्यांच्या पासून मला पत्रें मिळाली"

त्यांना बांधून घेऊन येणार होतो

"त्यांना सांखळदंडाने बांधून घेऊन येण्यांस मला हुकुम दिला होता"