Door43-Catalog_mr_tn/ACT/13/16.md

2.6 KiB

त्याच्या हाताने खुणावले

हाताने खुणावणे हे त्याने आपले हात हालवून मी बोलाण्यांस तयार आहे हा संकेत देणे ह्याकडे उल्लेख करू शकते. ह्याचे अशाप्रकारे भाषांतर करू शकतात, "त्याने आपले हात हालवून तो बोलण्यांस सुरुवात करीत आहे हा संकेत दिला"

देवाचे भय बाळगणाऱ्यांनो

ज्या परराष्ट्रीय लोकांनी देवावर विश्वास ठेवून त्याची उपासना करण्याचा निर्णय घेतलं होता त्यांचा उल्लेख करीत आहे. ह्याचे अशाप्रकारे भाषांतर केले जाऊ शकते, "तुम्ही जे इस्राएलामधून नाहीत परंतु देवाची उपासना करणारे आहात"

ऐका

"माझे ऐका" किंवा "मी जे कांही आत्ता सांगणार आहे ते ऐका"

ह्या इस्राएल लोकांच्या देवाने

"ज्या देवाची इस्राएल लोक उपासना करतात"

आमच्या पूर्वजांस निवडले

सर्वनाम "आमच्या" हे अनन्य असून जे पौल आणि त्याच्या सह यहूद्यांचा उल्लेख करतो. ह्याचे अशाप्रकारे भाषांतर होऊ शकते, "फार पूर्वी यहूदी लोकांना निवडले"

ते राहिले तेव्हा

"जेव्हा इस्राएल लोक राहिले तेव्हा"

त्यांना तेथून बाहेर काढले

"देवाने इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले"

त्याने त्यांना सहनशीलता दाखविली

"देवाने त्यांचे सहन केले" किंवा "देवाने त्यांचे गैरवर्तन सहन केले"