Door43-Catalog_mr_tn/ACT/13/11.md

2.7 KiB

११ व्या वचनांत पौल अलीमशी बोलणे पुढे चालू ठेवतो)

प्रभूचा हात तुझ्यावर आहे

देवाचे सामर्थ्य तुला शिक्षा करण्यास तयार आहे ह्याची ही अभिव्यक्ती आहे. ह्याचे अशाप्रकारे भाषांतर केले जाऊ शकते, "प्रभू त उल शिक्षा देईल" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

तू आंधळा होशील

"देव तुला आंधळा करील"

तुला सूर्य दिसणार नाही

अलीम हा पूर्णपणे आंधळा होईल. तो सूर्यप्रकाश सुद्धा पाहू शकणार नाही.

कांही वेळपर्यंत

"कांही कालावधीपर्यंत" किंवा "देवाने ठरविलेल्या वेळेपर्यंत:

अलीमवर धुके आणि अंधार पडला

"अलीमवर धुके अंड इ अंधकार पडला" किंवा "दाट धुके अलीमवर पडले" किंवा "अलीमचे डोळे धूसर झाले आणि त्याच्या डोळ्यांना अंधारी" किंवा "अलीमला सुरवातीला अस्पष्ट दिसू लागले मग नंतर त्यांला कधीच कांहीहि दिसू शकले नाही"

तो इकडे तिकडे फिरू लागला

"अलीम चहुबाजूला भटकू लागला" किंवा "त्याला चक्कर अल्यासारखे वाटू लागले"

राज्यपाल

रोमन प्रांताचा प्रभारी अधिकारी. ह्याचे अशाप्रकारे भाषांतर केले जाऊ शकते, "सुभेदार"

त्याने विश्वास ठेवला

"राज्यपालाने विश्वास ठेवला" किंवा "राज्यपालाने येशूवर विश्वास ठेवला"

त्याला आश्चर्य वाटले

"राज्यपाल ह्याने थक्क झाला" किंवा "राज्यपालाला फारच आश्चर्य वाटले"