Door43-Catalog_mr_tn/ACT/12/18.md

3.4 KiB

आता दिवस उजडल्यावर

"आता" हा शब्द हे निर्देशित करतो की कथेमध्ये नक्कीच खंड पडला आहे आणि कांही वेळेनंतर तो पुन्हा सुरु होईल. हयचे अशाप्रकारे भाषांतर केले जाऊ शकते, "आता सकाळ झाली तेव्हा" (पाहा: संभाषण माहीती)

लहान खळबळ नाही

हा परिणामकारक अभिव्यक्तीचा प्रकार आहे. ह्याचे अशा प्रकारे भाषांतर केले जाऊ शकते, "मोठी खळबळ" किंवा "पुष्कळ खळबळ" (पाहा: पर्यायोक्ती)

लहान खळबळ नाहो

येथे सकारात्मक नव्हे तर नकारात्मक "खळबळीचा" उल्लेख केला गेला आहे, जसे दु:ख, अत्यंत चिंता, भीती किंवा गोंधळ.

ह्याविषयी

"ह्या सबंधित" किंवा "ह्या बद्दल" # नंतर त्याने त्याचा शोध केला पर तो त्याला सापडला नाही, त्याचे भाषांतर असेही करता येईल, हेरोदाने पेत्राचा शोध केला पण पेत्र त्याला सापजला नाही

हेरोदाने त्याचा शोध केल्यानंतर तो त्याला सापडू शकला नाही. संभाव्य अर्थ असे आहेत १) "पेत्र नाहीसा झाल्याचे जेव्हा हेरोदाने ऐकले, तेव्हा तो स्वत: त्याचा शोध करण्यांस तुरुंगांत गेला" किंवा २) "पेत्र नाहीसा झाल्याचे जेव्हा हेरोदाने ऐकले, तेव्हा त्याने त्याला शोधण्यासाठी तुरुंगामध्ये दुसऱ्या शिपायांना पाठविले."

त्याने त्यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम दिला

"हेरोदाने पहारेकऱ्यांची चौकशी केली आणि त्यांना ठार मारण्याचा शिपायांना हुकूम दिला"

मग तो खाली गेला

"हेरोद खाली गेला," जेव्हा यरूशलेमे दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावयाचा असे तेव्हा ती सर्व ठिकाणे खाली असल्याचे गणले जात होते कारण यरूशलेम हे डोंगरावर वसलेले होते. (पाहा: संकेतवाचक)