Door43-Catalog_mr_tn/ACT/12/13.md

2.8 KiB

त्याने दार ठोकले

"पेत्राने दार ठोकले." दरवाजावर थाप मारूण इतरांना सूचित करणे की तुम्ही त्यांची भेट घेऊ इच्छिता ही यहूद्यांची सामान्य रीत होती.

गेटच्या दरवाजापाशी

"बाहेरील दरवाजापाशी" किंवा "रस्त्यापासून आवारांत येणाऱ्या प्रवेशद्वारापाशी"

कानोसा घेण्यास आली

"कोण दार ठोकीत आहे हे पाहाण्यासाठी गेट जवळ आली"

तिने ओळखले

"रूदाने ओळखले"

आनंद झाल्यामुळे

"कारण तिला फार आनंद झाला होता" किंवा "अति उत्सुक झाल्यामुळे"

दाराशी उभा आहे

"दाराबाहेर उभा आहे" पेत्र अजूनहि दाराबह्र उभा होता.

त्यांनी तिला म्हटले

"घरांत असलेल्या विश्वासणाऱ्यांनी नोकरांनी रूदाला म्हणाले"

तू वेडी आहेतस

लोकांनी केवळ तिच्यावर विश्वासच ठेवला नाही तर, ती वेडी असे म्हणून तिला दरडावले. ह्याचे अशाप्रकारे भाषांतर केले जाऊ शकते, "तू वेडी आहेस"

तिने आग्रहाने सांगितले ते तसेच आहे

"तिने जे कांही म्हटले ते खरे आहे असे रूदाने खात्रीपूर्वक सांगितले"

त्यांनी म्हटले

"घरामध्ये असलेल्या लोकांनी म्हटले"

तो त्याचा देवदूत आहे

"तू ज्याला बघितलेस तो पेत्राचा दूत आहे." कांही यहूदी लोकांचा पालक देवदूतांवर विश्वास होता आणि म्हणून त्यांना असे वाटले की पेत्राचा दूत कदाचित त्यांना भेटावयास आला असावा.