Door43-Catalog_mr_tn/ACT/09/03.md

1.7 KiB

प्रमुख याजकाने शौलाला पत्रें दिल्यानंतर तो दिमिष्कास रवाना झाला

तो प्रवास करीत असतांना

शौलाने यरूशलेम सोडले आणि आता तो दिमिष्काकडे प्रवास करीत आहे.

असे झाले की

कथेमधील बदलास चिन्हांकित करण्यासाठी ही एक अभिव्यक्ती आहे, की कांहीतरी वेगळे घडणार आहे.

स्वर्गातून...प्रकाश चमकला

आकाशांतून

तो जमिनीवर पडला

हे अस्पष्ट आहे की १) "शौलाने स्वत:ला जमिनीवर फेकले" किंवा २) "तो प्रकाशामुळे जमिनीवर पडला" किंवा ३) एखादा व्यक्ती मूर्च्छित होऊन पडतो तसा शौल जमिनीवर पडला. पौल चुकून पडला नव्हता.

माझा छळ का करितोस?

एका प्रश्नाच्या स्वरूपांत प्रभू शौलाची खरडपट्टी काढीत होता. ह्याचे अशा प्रकारे भाषांतर केले जाऊ शकते, "तू माझा छळ करीत आहेस." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)