Door43-Catalog_mr_tn/ACT/03/11.md

3.7 KiB

जसा

"असतांना"

द्वारमंडप ज्याला शलमोनाचे नांव दिले होते

"शलमोनाची देवडी" शलमोन नांवाचा राजा त्यावेळेपासून फार वर्षांपूर्वी होऊन गेला होता. देवडी ही छप्पराने झांकलेली एका बाजूने उघडी अशी स्तंभांची रांग होती. ह्याचे "शलमोनाचा व्हरांडा" म्हणून भाषांतर केले जाऊ शकते. शलमोनाची देवडी फार भव्य होती.

त्यांना फार आश्चर्य वाटले

"आश्चर्याने थक्क होणे", किंवा "चकित होणे" किंवा "भीतीयुक्त आदर"

जेव्हा पेत्राने हे बघितले

"गर्दी वाढत असल्याचे जेव्हा पेत्राने पाहिले" किंवा "जेव्हा पेत्राने लोकांना पाहिले" (UDB)

अहो इस्राएल लोकांनो

"माझ्या बांधावांनो" (UDB). पेत्र लोकांच्या जमावाला संबोधित करीत होता. "हे लोकांनो" ह्या संदर्भात हे उपस्थित असलेल्या सर्वांना लागू होते (पुरुष, स्त्रियां, मुलें).

ह्याचे आश्चर्य का करिता?

हा अलंकारयुक्त प्रश्न आहे. "तुम्ही आश्चर्यचकित होण्याची आवश्यकता नाही" असे देखील ह्याचे भाषांतर केले जाऊ शकते. UDB. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तुम्ही आम्हांकडे निरखून का पाहता?

ह्या अलंकारयुक्त प्रश्नाचे असे देखील भाषांतर केले जाऊ शकते, "तुम्ही आमच्याकडे निरखून पाहू नये" किंवा "आमच्याकडे निरखून पाहाण्याचे तुम्हांला कांहीच कारण नाही."

आम्हांकडे

"आम्हांकडे" हे पेत्र आणि योहानाचा उल्लेख करते, दुहेरी आणि अनन्य प्रकार

आम्ही

"आम्ही" हे पेत्र आणि योहानाचा उल्लेख करते, दुहेरी आणि अनन्य प्रकार

जणू कांही आम्हीं आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालावयास लाविले आहे?

हा अलंकारयुक्त प्रश्न आहे. ह्याचे अशाप्रकारे भाषांतर केले जाऊ शकते, "आम्ही आमच्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालावयास लाविले नाही."