Door43-Catalog_mr_tn/ACT/02/16.md

2.3 KiB

ह्या वचनामध्ये पेत्राने यहूद्यांसाठी त्याचे भाषण सुरु केले होते ते तो पुढे चालू ठेवीत आहे.

योएल संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते ते हे आहे

"देवाने हेच काय ते म्हटले आणि योएल संदेष्ट्याला लिहिण्यांस सांगितले" किंवा "देवाने सांगितलेल्या ह्या गोष्टीं योएल संदेष्ट्याने लिहिल्या."

काय सांगितले होते

ह्याचे सक्रीय क्रियापदाबरोबर भाषांतर करू शकता; "देवाने काय सांगितले" किंवा "देवाने कशाबद्दल सांगितले." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

शेवटच्या दिवसांत होईल

ह्याचे भाषांतर असे करू शकता "शेवटच्या दिवसांत." तो ज्या गोष्टींबद्दल सांगणार आहे त्या शेवटच्या दिवसांत घडतील. देवाने जे सांगितले त्याचा हा पहिला भाग आहे. (UDB) मध्ये आल्याप्रमाणे "देव म्हणतो" हे शब्द प्रथम येऊ शकतात.

सर्व मनुष्यमात्रांवर आत्म्याचा वर्षाव करीन

हा भाषालंकार आहे जो असे सांगतो की किती विपुलतेन देव सर्व लोकांना त्याचा आत्मा देईल.

सर्व मनुष्यमात्र

"सर्व लोक." हे लोकांचा उल्लेख करते कारण लोक हे शरीराने बनलेले आहेत (पाहा: उपलक्षण)