Door43-Catalog_mr_tn/2TI/04/06.md

3.4 KiB
Raw Permalink Blame History

कारण

वचन ५ मध्ये पौल ही आज्ञा का देतो हे सांगणे. त्याचे भाषांतर ‘’कारण’’ किंवा ‘’यामुळे’’असे करता येते.

माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे

‘’लवकरच माझा मृत्यू होऊन मी जग सोडून जाईन’’ (युडीबी). पौलाला कळते की तो खूप काळ जगणार नाही.

त्या चांगल्या स्पर्धेत मी भाग घेतला आहे

संघर्ष, झुंज, किंवा कुस्ती यासाठीच हा खेळाडू रूपक अलंकार आहे. पौलाने त्याचे उत्तम प्रयत्न केले आहेत. या चे भाषांतर देखील ‘’मी उत्तम केले’’ किंवा ‘’मी उत्तम ते दिले.

मी धाव संपवलेली आहे

हा रूपक अलंकार आहे ज्यात जीवन संपण्याची तुलना धावरेषा पार करण्याशी केली गेली आहे. याचे भाषांतर देखील ‘’जे हवे ते मी पूर्ण केले आहे.

विश्वास राखिला आहे

शक्य अर्थ म्हणजे १) ‘’कोणत्याही चुकीपासून दूर राहून मी ती शिकवण जपली आहे’’ किंवा २) ‘’माझी सेवा करण्यात मी विश्वासू राहिलो आहे’’ (पहा युडीबी)

नितीमत्वाचा मुकूट ठेविला आहे

याचे भाषांतर ‘’नितीमत्वाचा मुकूट मला देण्यात येईल.

नितीमत्वाचा मुकूट

शक्य अर्थ म्हणजे १) मुकूट हे ते बक्षीस आहे जे देव लोकांनी योग्य प्रकारचे जीवन जगण्यासाठी देणार आहे (पहा युडीबी) किंवा २) मुकूट एक रूपक अलंकार आहे (पहा रूपक अलंकार)नितीमत्वासाठी; जसा धावेत परीक्षक जिंकणाऱ्याला मुकूट देतो, जेव्हा पौल आपले जीवन संपवेल, तो नीतिमान आहे असे देव घोषित करेल.

मुकूट

स्पर्धेत विजेत्यांना देण्यात येणारे सजवलेले वनस्पतीचे सुशोभित सन्मान चिन्ह म्हणून मुकूट’’

त्या दिवशी

‘’प्रभू परत येईल त्या दिवशी’’ किंवा ‘’ज्या दिवशी देव लोकांचा न्याय करेल’’