Door43-Catalog_mr_tn/2CO/04/07.md

2.6 KiB

ही संपत्ति

"लेखक देवाच्या ज्ञानाचे तेज हे येशू ख्रिस्ताच्या चेह

यांत आहे ह्याचा उल्लेख करीत आहे." (पाहा: रूपक)

मातीची भांडी

लेखक मानवी शरीराचा उल्लेख करण्यासाठी ह्या वाक्यांशाचा उपयोग करीत आहे. (पाहा: वाक्प्रचार)

चोहोकडून आमच्यावर संकटे आली, तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यांत आला नाही; आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही

आव्हानाशी लढा देत असलेल्या परंतु पराजित न झालेल्या व्यक्तीचा हे सर्व वाक्यांश उल्लेख करीत आहेत. (पाहा: समांतरवाद)

आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरांत वागवितो

"येशूचा वध" हा वाक्यांश येशू ह्यासाठी मेला की लोकांना त्यांच्या पापांची क्षमा प्राप्त होऊ शकेल ह्या आमच्या येशूबद्दलच्या ज्ञानाचा उल्लेख करतो. AT: "आम्ही नेहमी आमच्या शरीरांत येशूच्या वधाच्या ज्ञानास वागवितो." (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

येशूचे जीवन सुद्धा आमच्या शरीरांत प्रगट व्हावे

"आमच्या शरीरांत" हा वाक्यांश येशूचा विश्वासी कसे जीवन जगेल ह्याचा उल्लेख करतो. AT: "येशूचे जीवन सुद्धा आमच्या शरीरांत प्रगटहोऊ शकते. (पाहा: उपलक्षण)